शेअर मार्केट म्हणजे काय ? 2026 मध्ये शेअर मार्केट मध्ये सुरुवात कशी करावी ?🤔

माहिती शेअर करा.
शेअर मार्केट म्हणजे काय
शेअर मार्केट म्हणजे काय

शेअर मार्केट म्हणजे काय 📊

शेअर मार्केट म्हणजे काय:- नमस्कार मराठी एक्स्पर्ट या संकेतस्थळावर आपल्या सर्वांचे स्वागत..! हा लेख लिहिण्याचा मुख्य उद्धेश म्हणजे आजकाल चर्चेत असणारा विषय आणि तो म्हणजे शेअर मार्केट.शेअर मार्केट म्हंटल कि सामान्य माणसाला पडणारा पहिला प्रश्न म्हणजे हे शेअर मार्केट नेमकं असत तरी काय..?

आपल्या सर्वांना पडणाऱ्या याच किचकट प्रश्नाचं सुटसुटित उत्तर देण्यासाठी आम्ही घेऊन आलोय हा महत्वपूर्ण लेख..हा संपूर्ण लेख शेवटपर्यंत नक्की वाचा याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.

Share marketing information in marathi 📉

भारतीय शेअर बाजाराचा इतिहास 📜:- शेअर बाजाराची सुरुवात १८ व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये मुंबईमध्ये झाली. त्यावेळी मुंबईला बॉम्बे असं म्हंटल जायचं.त्याकाळी ब्रोकर्स / शेअर दलाल हे ऑफिसमध्ये न बसता एका वडाच्या झाडाखाली (Banyan Tree) बसून शेअर्सचे व्यवहार करायचे.

हे वडाचे झाड टाऊन हॉलसमोर होते जे आजचे हॉर्निमन सर्कल म्हणून ओळखले जाते. त्यावेळी मुख्यतः बँकांच्या आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या शेअर्सचा व्यवहार होत असायचा.

त्यांनतर १८६० च्या दशकामध्ये झालेल्या Civil War मुळे भारताच्या कापूस व्यवसायाला चालना मिळाली आणि भारतीय शेअर बाजारामध्ये तेजी यायला सुरुवात झाली.त्यामुळे ब्रोकर्स म्हणजे दलाल यांच्या संख्येमध्ये वाढ व्हायला सुरुवात झाली.

त्यांनतर १८७५ मध्ये सर्व दलालांनी एकत्र येऊन ‘The Native Share & Stock Brokers’ Association’ हि संस्था स्थापन केली.ज्या संस्थेला आपण आज BSE म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणून ओळखतो.

पुढे जाऊन १९ व्या शतकामध्ये हि संस्था दलाल स्ट्रीट वर जाऊन स्थित झाली जे आज भारतीय शेअर मार्केटचे मुख्य केंद्र बनले आहे.

सन १९५६ मध्ये या शेअर बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी Securities Contracts (Regulation) Act पास केला गेला आणि त्यानंतर सरकारमार्फेत सेबी (SEBI) ची स्थापना केली गेली. सेबी हि संस्था शेअर बजामधील गैरव्यवहार लक्ष ठेवते आणि गुंतवणूकदारांचे हित जपण्यासाठी सदैव तत्पर असते.

शेअर मार्केट मराठी माहिती

चला तर आता या आपण आपल्या मूळ मुद्याकडे येऊ आणि तो म्हणजे शेअर बाजार म्हणजे काय?

शेअर मार्केट म्हणजे काय हे आपण एका उदाहरणामधून समजून घेऊ,

समजा आपल्याला एखादा व्यवसाय सुरु करायचा आहे त्यासाठी आपल्याला भांडवलाची आवश्यकता आहे. ते भांडवल उभे करण्यासाठी आपण आपले नातेवाईक, मित्र-मंडळी, बँक, कर्ज, सोने तारण कर्ज अशा अनेक माध्यमांमधून भांडवल उभे करतो आणि आपला व्यवसाय सुरु करतो.

असे करून आपले भांडवल उभे राहते कारण, आपल्याला भांडवल हे हजार किंवा लाखांमध्ये लागत असते मात्र कंपन्यांचं तस नसत त्यांना करोडो रुपयांची किंवा त्याहूनही अधिक पैशांची आवश्यकता असते.

अशा वेळी कंपनी आपले भांडवल उभे करण्यासाठी शेअर बाजारामध्ये आपले शेअर्स विक्रीला काढते आणि आपले भांडवल उभे करण्याचा प्रयत्न करते.जेव्हा कोणतीही कंपनी पहिल्यांदाच शेअर बाजारामध्ये लिस्ट होत असते तेव्हा ती सर्वात आधी आपला IPO बाजारामध्ये आणते.

  • (आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि हा IPO म्हणजे काय? काळजी करू नका IPO म्हणजे काय हे आपण पुढील लेखामध्ये पाहू.)

ज्या वेळी तुम्ही त्या कंपनीचे शेअर्स खरेदी करता तेव्हा तुम्ही त्या कंपनीचे भागधारक बनता थोडक्यात तुम्ही त्या कंपनीचे अंशतः मालक बनता.आता जर तुम्ही एखाद्या कंपनीचे मालक बनला आहात तर त्या कंपनीने चांगली कामगिरी केली तर तुम्हाला त्याचा आर्थिक फायदा होणार आणि जर त्या कंपनीने खराब कामगिरी केली तर होणारे नुकसानही तुम्हालाच सोसावे लागणार आहे.

शेअर मार्केट म्हणजे काय

Share Marketing Information in Marathi:- शेअर मार्केट / स्टॉक मार्केट म्हणजे असे ठिकाण जिथे शेअरची खरेदी विक्री केली जाते.

समजा एखाद्या कंपनीची एकूण किंमत (Valuation) १० लाख रुपये आहे आणि त्या कंपनीच्या एका शेअरची किंमत १० रुपये आहे.जर तुम्ही त्या कंपनीचे १०० शेअर्स खरेदी केले (१०० x १० = १,००० रुपये देऊन) तेव्हा तुम्ही त्या कंपनीचे ०.१% मालक बनता.

आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल कि, कोणतीही कंपनी आपले शेअर्स असे का विकत असेल ?आणि आम्ही ते शेअर्स खरेदी केले तर त्यामुळे आम्हाला काय फायदा मिळेल ? 

त्याआधी हे बघू कि कंपनी आपले शेअर्स विकायला का काढते?

तर ,कोणतीही कंपनी खालील तीन मुख्य कारणांसाठी आपले शेअर्स विक्रीसाठी काढते

  1. कंपनीची व्याप्ती म्हणजेच Expansion करण्यासाठी
  2. नवीन प्रोजेक्ट्स सुरु करण्यासाठी
  3. कंपनीवरील कर्ज फेडण्यासाठी
  • 💡प्रो टीप🚀 :- जर एखादी कंपनी स्वतःवरील कर्ज कमी फेडण्यासाठी किंवा कर्जाचा भार कमी करण्यासाठी आपले शेअर्स विक्रीला काढत असेल / IPO आणत असेल तर अशा कंपनीच्या IPO पासून दूर राहणे आपल्यासाठी योग्य राहील.

आता तुम्हाला पडलेला पुढचा आणि महत्वाचा प्रश्न शेअर खरेदी करून आम्हाला काय फायदा मिळेल?

कोणीही शेअर खरेदी करताना त्याचा मुख्य उद्देश शेअरची किंमत वाढून नफा कमवणे हा असतो. हा नफा दोन प्रकारचा असतो

१.शेअरच्या किमतीमध्ये वाढ :- जर कंपनीची कामगिरी चांगली राहिली तर कंपनीच्या नफ्यामध्ये वाढ होऊन त्या कंपनीच्या शेअर्सची मागणीमध्ये वाढ होते आणि त्या शेअरची किंमत वाढते. तसेच कंपनीची कामगिरी या विरुद्ध राहिली तर शेअर धारकांना नुकसान होते.

कोणत्याही कंपनीची प्रगती तपासण्यासाठी त्या कंपनीच्या Quarterly Result वर लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.त्यामधून तुम्हाला त्या कंपनीच्या नफ्यामध्ये वाढ होत आहे कि घट होत आहे हे समजते.

२.शेअरवर मिळणार लाभांश :- लाभांश यालाच इंग्रजीमध्ये Dividend असे म्हणतात.जेव्हा एखाद्या कंपनीला नफा होतो तेव्हा कंपनी त्या नफ्यामधील काही भाग शेअर धारकांना वाटते त्याला लाभांश असे म्हणतात.हा लाभांश शेअर धारकांना मिळालेला अतिरिक्त लाभ / उत्पन्न असतो.

कंपनीला जरी नफा झाला असेल तरी तो नफा शेअर धारकांना वाटायचा कि नाही हा अंतिम निर्णय त्या कंपनीचा असतो.

  • आता पाहू कि भारतीय शेअर बाजार काय आहे?

भारतामधील २ प्रमुख शेअर बाजार आहेत,

भारतामध्ये अधिकृतरीत्या शेअरची खरेदी विक्री करण्यासाठी २ शेअर बाजार आहेत.

  1. BSE (Bombay Stock Exchange)🏢:- यालाच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असे म्हणतात.हे आशियाखंडातील सर्वात जुने स्टॉक एक्सचेंज आहे.
  2. NSE (National Stock Exchange)🏢:- हे भारतामधील सर्वात आधुनिक आणि सर्वात मोठे स्टॉक एक्सचेंज आहे.

काही कंपन्या फक्त BSE मध्ये रजिस्टर्ड असतात काही कंपन्या फक्त NSE मध्ये रजिस्टर्ड असतात तर काही कंपन्या NSE आणि BSE दोन्ही बाजारामध्ये लिस्टेड असतात. ज्यावेळी तुम्हाला कंपनी NSE आणि BSE दोन्हीमध्ये लिस्टेड दिसेल त्यावेळी तुम्ही त्या कंपनीच्या NSE मधील शेअरला प्राधान्य द्या जर ती कंपनी फक्त BSE मध्ये लिस्टेड असेल तर त्या कंपनीचा शेअर घेण्यास हरकत नाही.शेवटी दोन्ही बाजार सेबी च्या नियंत्रणाखाली आहेत.

  • NSE चे अधिकुत संकेतस्थळ – लिंक
  • BSE चे अधिकुत संकेतस्थळ – लिंक

एकाच पोस्टमध्ये संपूर्ण शेअर बाजार शिकवणे कठीण आहे त्यामुळे शेअर बाजार संबंधीची इतर सर्व महत्वपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप पुढे पाहणार आहोत.


तुम्ही आमच्या या वेबसाईटवर तुमची हजेरी लावत राहा, आम्ही तुम्हाला आर्थिक साक्षर बनवण्यासाठी दर्जेदार माहिती असणाऱ्या पोस्ट्स बनवत राहू. हे संकेतस्थळ तुमच्या सर्वांसाठी फ्री आहे आणि नेहमी असेल.

अपडेट राहण्यासाठी आमच्या संपर्कात राहा. आम्ही तुमच्यापर्यंत सर्व महत्वाची माहिती विनामूल्य पाठवू..!

धन्यवाद….! 🙏

Name
Email

शेअर बाजारातून तुम्ही महिन्याला किती पैसे कमवू शकता?

शेअर बाजारामधून नेमके किती पैसे कमवता येतील याचा अचूक अंदाज नाही कारण ते पूर्णतः तुमच्या कॅपिटल आणि जोखीम पत्करण्याची क्षमतेवर अवलंबून असते.

शेयर मार्केट कसे शिकावे?

शेअर मार्केट शिकण्यासाठी विविध ऑनलाईन ,ऑफलाईन कोर्सेस आहेत तसेच युट्युब वर फ्री व्हिडीओ देखील उपलब्ध आहेत.

शेअर मार्केटमध्ये कोणते प्रकार आहेत?

शेअर मार्केट मध्ये Equity आणि Derivatives हे मुख्य प्रकार आहेत.


मी शेअर बाजारात १ रुपये गुंतवू शकतो का?

हो,जर एखादा शेअर १ रुपयांना असेल तर तुम्ही तो शेअर विकत घेऊ शकता पण लक्षात ठेवा या व्यतिरिक्त तुम्हाला ब्रोकर चार्जेस आणि इतर चार्जेस हे देखील द्यावे लागतात.

मी शेअर मार्केटमधून दररोज ५०० रुपये कमवू शकतो का?

असं कोणी तुम्हाला ठामपणे सांगू शकत नाही कारण यासाठी तुमचे भांडवल किती आहे आणि तुम्हाला शेअर मार्केटचे किती ज्ञान आहे यावर ते अवलंबून आहे.

Leave a Comment